Chitra Wagh on Ajit Pawar : अजित पवार वातावरण गढूळ करतायत, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल ABP Majha
Nashik Ajit Pawar : नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशनात (Winter Session) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीराजे (Chatrapati SambhajiRaje) धर्मवीर नव्हते, असे विधान केले. त्या विधानानंतर आज शिंदे गट व भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून विविध नेत्यांनी केलेल्या महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यांमुळे हा राजकीय मुद्दा बनून गाजत आहेत. सत्ताधारी मंडळींविरुद्ध विरोधकांनी याच मुद्द्यावरून रान पेटविले आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या विधानाची आयतीच संधी सत्ताधारी मंडळींना मिळाली आहे. त्यामुळे केवळ निषेध करण्यापेक्षा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय भाजपसह शिंदे गटाने घेतल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik0 शहरात रविवार कारंजा येथे सकाळी दहा वाजता व दुपारी 12 वाजता मुंबई नाका येथे दोन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या (Shinde sena) वतीने देखील नाशिकच्या शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात आंदोलन करण्यात आले.