Ganpati Aagman | चिंचपोकळीचा Chintamani, परळमध्ये पोलीस बंदोबस्त, गणेशभक्तांचा उत्साह
गणेशोत्सवासाठी अवघे नऊ दिवस शिल्लक असताना मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. चिंचपोकळीचा Chintamani सह अनेक मानाच्या गणेश मूर्ती परळ WorkShop मधून आगमनासाठी बाहेर पडल्या आहेत. बाप्पाच्या पहिल्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. प्रत्येकजण मोबाईलमध्ये बाप्पाचे रूप टिपण्यासाठी उत्सुक आहे. लालबाग आणि परळ परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. या आगमनाच्या पार्श्वभूमीवर परळ येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दादर येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपुलापासून ते लालबागच्या उड्डाणपुलापर्यंत संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरात बॅरीगेटिंग केली असून वाहतुकीसाठी दोन्ही रस्ते बंद आहेत. कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन काळजी घेत आहे. एकीकडे मूर्तींचे आगमन सुरू असताना दुसरीकडे पावसानेही जोर पकडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















