China : चीन पळवतंय भारतातली गाढवं, गेल्या 9 वर्षांत देशातील गाढवांची संख्या 61.23 टक्क्यांनी कमी
चीननं गेल्या काही वर्षांत भारतातली गाढवं पळवण्याचा उद्योग सुरू केलाय. ब्रुक इंडियानं केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या 9 वर्षांत देशातील गाढवांची संख्या 61.23 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती त्यात आहे. देशी औषधांसाठी लागणारा महत्त्वाचा कच्चा माल म्हणून गाढवांचा उपयोग होतो. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतून तस्करीद्वारे गाढवांची कातडी चीनमध्ये पोहोचवली जातायत. आधी वाघांच्या अवयवांची तस्करी चीनमध्ये होत होती. चीनमध्ये तयार होणाऱ्या इजियाओ या पारंपरिक औषधासाठी गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. त्यासाठी गाढवांची तस्करी केली जातेय. चीनच्या या आगळीकीमुळे भारतात 2012 साली असलेली 3 लाख 20 हजार इतकी गाढवांची संख्या घटून ती 2019 साली पशुधन गणनेत 1 लाख 20 हजार इतकी झालीय.