Chhatrapati Sambhaji nagar : मराठवाड्यावर वरूण राजाची कृपा, बळीराजाची पेरणीसाठी लगबग
Chhatrapati Sambhaji nagar : मराठवाड्यावर वरूण राजाची कृपा, बळीराजाची पेरणीसाठी लगबग
मराठवाड्यावर वरूण राजानं कृपा केलीय. पाऊस झाल्यानं बळीराजा आता लगबगीनं पेरणीला लागलाय. छ. संभाजीनगर जिल्ह्यात सोयाबीन तूर कपाशी मकाची लागवड सुरू झाली आहे.
याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. मराठवाड्यावर वरून राजाने कृपा केली ,त्यामुळे राण ओली झाली आहेत. शेतकरी लगबगीने पेरणीच्या कामाला लागलाय. संभाजीनगर जिल्ह्यात सोयाबीन तूर कपाशी मकाची लागवड सुरू झाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी..
महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या....
छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानंतर पेरणीच्या कामांना वेग, जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कपाशी तसेच मक्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग.
पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं, हिरवा शालू पांघरलेल्या डोंगर रांगा आणि ढगांचा सुरू असलेला लपंडाव पर्यटकांना खुणावतोय
धुळे जिल्ह्यात अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांची पेरणीची तयारी पूर्ण, मात्र अद्यापही दमदार पावसाला सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.