एक्स्प्लोर
Maratha Quota Row | Chhagan Bhujbal यांचा निर्णय बदलला, कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार
मंत्री छगन भुजबळ यांनी आपला निर्णय बदलला आहे. ते आता कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्री-कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहून पुढील माहिती नसल्याची सूचक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, काही मिनिटांतच त्यांनी आपला निर्णय बदलला. कॅबिनेट बैठकीनंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शासन निर्णय (GR) देण्यासारख्या निर्णयांसंदर्भात ते निवेदन देतील. मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जीआरचा निषेध नोंदवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही देण्यात येणार आहे. गेल्या आठवडाभरापासून ओबीसी समाजात या मराठा आरक्षण GR वरून मोठा रोष आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी भुजबळ यांनी मागील आठवड्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला होता. आजही ते बहिष्कार टाकतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली होती, परंतु आता त्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
व्यापार-उद्योग
ठाणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















