Ulfa - Assam - Central Peace Treaty : केंद्र,आसाम आणि उल्फामध्ये शांतता करार संपन्न, 2011पासून चर्चा
ईशान्य भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बातमी आहे. उल्फा या सर्वात मोठ्या फुटीरतावादी संघटनेशी भारत सरकार आणि आसाम सरकारनं शांतता करार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा आणि उल्फाचे प्रमुख अरविंद राजखोवा यांच्या उपस्थित हा करार करण्यात आला. १९७९ सालापासून United Liberation Front of Assam, अर्थात उल्फा ही संघटना विभक्त आणि सार्वभौम आसामची मागणी करत होती, मात्र जशी वर्षं सरत गेली, तशी उल्फाची भूमिका मवाळ होत गेली. २०११ पासूून केंद्र सरकार आणि उल्फामध्ये बोलणी सुरू होती. त्याची परिणीती आज शांतता करारात झाली. उल्फाच्या बरुआ गटानं मात्र या कराराला विरोध केला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
