एक्स्प्लोर
Buldhana पोलिसांचं अशोभनीय वर्तन, मद्यधुंद अवस्थेत डान्स ; आ.संजय गायकवाड यांनी पोलीसाला धारेवर धरले
महामार्गावर आपली कार आडवी लावून मार्गावर डान्स करणाऱ्या बुलढाण्यातील पोलिसांना काल सायंकाळी आमदार संजय गायकवाड आणि नागरिकांनी चांगलाच धडा शिकविला , दरम्यान डान्स करणाऱ्या पोलिसांमुळे मात्र खामगाव जालना महामार्ग जवळपास 40 मिनिटे जाम झाला होता. सदर पोलीस हे मद्यधुंद होते अस ही कळलं आहे.
मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील बीबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सुगदेव पवार आणि इतर पोलिसांमुळे ट्राफिक जाम झालं. तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलढाणाकडे जाणारे आमदार संजय गायकवाड यांनी सदर पोलिसाना चांगलेच धारेवर धारल्याचे समोर आलं आहे. पोलीस " लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यपी पोलिसांनी जालना खामगाव महामार्गावर वाहन उभं करून महामार्गाच्या मध्यभागी डान्स सुरू केला. हा प्रकार जवळपास 40 मिनिट सुरू होता दरम्यान या महामार्गावर ट्रॅफिक जाम झाली होती. सदर प्रकार देऊळगाव महीनजीक सरंबा फाट्यावर काल सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
याबाबत प्राप्त माहिती नुसार आमदार संजय गायकवाड हे आपल्या वाहनाने बुलढाण्याकडे येत होते देऊळगाव महीच्या सरंबा फाट्यानजीक पुढे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ठप्प झालेल्या वाहतूक इथून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध "पोलीस" लिहिलेली पाटी असलेली एम एच २८ ए.एन ३६४१ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कार समोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते. परिणामी चिखली येथून येणारी वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती. हा प्रकार पाहून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांचा राग अनावर झाला व त्यांनी त्या तथाकथित पोलिसाला चांगलेच धारेवर धरले अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्यामध्ये मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद झाला व पोलीस लिहिलेल्या त्या पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये बसून त्यांनी पळ काढला. यात बीबी पोलीस स्टेशनचा सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय पवार व त्याचे दोन साथीदार असल्याची माहिती कळली आहे .
महाराष्ट्र
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग





















