Mahavitaran Buldhana : बुलढाण्यात महावितरणचे 750 कर्मचारी संपावर, अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
जिल्ह्यातील जवळपास साडेसातशे महावितरणचे कर्मचारी हे संपावर गेलेले आहे विशेष बाब म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संपला पाठिंबा दिल्यामुळे जिल्ह्यातील 152 कंत्राटी कर्मचारी हे आजपासून संपावर असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर येत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरातील 80 टक्के वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हे खामगाव येथे पोहोचले असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होताना दिसत आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागातूनही वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे तर जिल्ह्यातील मोठ्या उपकेंद्रावर वीज कर्मचारी संपावर गेल्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था पुरवलेली आहे मोठा सुरक्षा बंदोबस्त वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आणि वीज वितरण च्या बाहेर आपल्याला दिसत आहे. जिल्ह्यात शंभर टक्के कर्मचारी व त्यांना पाठिंबा देणारे 152 कर्मचारी संपावर असल्याने जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था कोलमडण्याची शक्यता असल्याची माहिती अधीक्षक अभियंता बद्रीनाथ जायभाय यांनी दिली आहे.