Buldhana : बुलढाण्यात "सैराट" ची पुनरावृत्ती, पोलीस स्टेशन जवळच प्रेमीयुगुलावर प्राणघातक हल्ला
बुलढाण्यातील खामगाव शहरात सैराट या सिनेमाची पुनरावृत्ती बघायला मिळाली आहे. 25 ऑक्टोबर रोजी पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाने लग्न करून काल रात्री परत येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जवाब देण्यासाठी हजेरी लावली यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन परिसरातच प्रेमी युवक रघु विजय तिवारी व डॉली रघु तिवारी या नवदाम्पत्याशी वाद घालून युवकावर गुप्तीने प्राणघातक हल्ला केला , यावेळी या युवकाच्या पोटात गुप्तीने वार करण्यात आले ,यात रघु विजय तिवारी हा प्रेमी युवक गंभीर जखमी झाला असून त्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला सर्वोपचार रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलंय. यावेळी पोलीस स्थानक परिसरातच हा हल्ला झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.





















