लेटर वॉर! भाजपच्या महिला आमदार मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिणार- काय आहे कारण
राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था याविषयी चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, असे निर्देश देणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. "हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपालानी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी", असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर आता भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या 12 महिला आमदार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.




















