BJP Vs Thackeray Group :भाजप-ठाकरे गटात राडा, कार्यकर्ते ताब्यात नेत्यांची मुलं सुटली Special Report
BJP Vs Thackeray Group Rada Special Report : भाजप ठाकरे गटात राडा, कार्यकर्ते पोलिसांच्या कचाट्यात बड्या नेत्यांची मुलं सहीसलामत सुटली
कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणतात मात्र असं क्वचितच घडतं. संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंना भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला.. यावरुन भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले.. यावरुन पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हेही दाखल केले.. मात्र यातून वगळण्यात आली ती नेत्यांची मुलं.. त्यामुळे नेत्यांच्या पुत्रांवर पोलिसांची मेहरबानी का? असा सवाल उपस्थित केला जातोय. पाहूया याचसंदर्भातला एक रिपोर्ट...























