एक्स्प्लोर

Bhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला

Bhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला हाथरसमध्ये नेमकं चेंगराचेगरी का झाली ? उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. रतिभानपूर इथे आयोजित स्वयंभू संत भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे आतापर्यंत 116 जणांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 116 वर पोहोचला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढवण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.हाथरसमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या समोर आलेल्या फोटोंनी केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पडलेला मृतदेहांचा ढीग अपघाताची भीषणता सांगत होता. हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टम हाऊसमधील आरडाओरडा काळीज पिळवटणारा होता. हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव भागात ही घटना घडली. भोले बाबांच्या सत्संगासाठी ही अलोट गर्दी झाली होती. पण सत्संग संपल्यानंतर उन्हात बसलेल्या लोकांनी घरी परतण्यासाठी गर्दी केली. यानंतरचं दृश्य खूपच भयावह होतं. लोक एकमेकांना तुडवून जात होते. एकमेकांवर पडत होते.अपघातानंतर मृतदेह, जखमींना ट्रक आणि इतर वाहनांमध्ये भरून सिकंदरौ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं. इतके मृतदेह होते की, शवाघर पूर्ण भरुन गेलं होतं. अखेर रुग्णालयाबाहेरच्या आवारात मृतदेह ठेवण्यात आले. तिथेच नातेवाईकांनी गर्दी केली होती. काही मृतदेहांची ओळख पटली होती, तर काहींची ओळख अद्याप पटलेली नव्हती. तिथेच पडलेल्या मृतदेहांच्या ढिगात जमलेल्या नातेवाईकांकडून आपल्या आप्तेष्ठांचा शोध सुरू होता. तर आपल्या जवळच्यांना गमावलेल्या दुःखानं आक्रोश ऐकू येत होता. हाथरसमधील या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्रकमध्ये मृतदेह ठेवले होते. तिथे बसून एक महिला रडत होती. दुसऱ्या एका फोटोमध्ये एक महिला आणि एक पुरुष दुसऱ्या वाहानात बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला.अपघाताचा साक्षीदार असलेल्या एका महिलेनं सांगितलं की, सत्संग संपल्यानंतर लोक घटनास्थळावरुन बाहेर पडत होते. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांना तुडवून पुढे जात होते. सिकंदरराव पोलीस स्टेशनचे एसएचओ आशिष कुमार यांनी सांगितलं की, प्रचंड गर्दीमुळे हा प्रकार घडला. सिकंदररावचे आमदार वीरेंद्र सिंह राणा म्हणाले की, हा एक दिवसाचा सत्संग होता आणि मंगळवारी सकाळी त्याची सुरुवात झाली.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मदतकार्याला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांनी आग्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अलिगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं आणि तपासाच्या सूचना दिल्या.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषण
Rohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rohit Sharma Marathi speech : सूर्याच्या हातात बॉल बसला,नाहीतर त्याला बसवला असता, रोहितचं मराठी भाषणTeam India Meet CM Shinde : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार, वर्षा निवासस्थानी भेटAditya Thackeray On Adani : मुंबई गिळायची नाही त्याला आमचा कडाडून विरोध, ठाकरेंचा संतापVijay Wadettiwar Mumbai : अदानीच्या सेवेसाठी सेवक काम करतात, सरकारवर गंभीर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
विधान परिषदेला 12वा खेळाडू कोणाचे 'बारा' वाजवणार? मिलिंद नार्वेकरांची सर्वपक्षीय दोस्ती कामी येणार?
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
सावधान! 'या' 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर ठिकाणी कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय? 
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
''तुम्ही म्हणाल तिथं जयंतरावांना घेऊन जायला तयार''; अजित पवारांनी विधानसभेतूनच सांगितलं
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
राज्य सरकारचा मोठा निर्णय, EWS, SEBC आणि ओबीसी विद्यार्थिनींना शिक्षण आणि परीक्षा शुल्क परत मिळणार
Embed widget