Be Positive : हरवलेला मुलगा 10 वर्षानंतर घरी परत, आधार कार्डामुळे सापडली घरची वाट
चिखलदरा तालुक्यातील बोरी येथील दिनेश दहीकर हा 14 वर्षांचा मुलगा हा 10 वर्षांपूर्वी गावातील तरुणांबरोबर कामाच्या शोधात मुंबईला गेला होता. पण तिथे पोहोचताच तो त्याच्या सहकाऱ्यांपासून विभक्त झाला होता. त्यानंतर तो दोन वर्षे मुंबईत भटकला. कसा तरी त्याने आपल्या गावी परत येण्यासाठी पैसे गोळा केले, पण ट्रेनबद्दल माहिती नसल्याने तो दुसऱ्याच ट्रेन मध्ये बसला आणि तो पोहचला पुणे.. मग दिनेश तिथे काम करू लागला. तीथे त्याला कर्नाटकातील ख्वाजा भाई नावाच्या ठेकेदाराने आश्रय दिला. त्याला त्याच्या घरी नेले आणि आठ वर्षे त्याची मुलासारखी काळजी घेतली. दिनेश आपले घर आणि गाव पूर्णपणे विसरला होता. त्याला त्याच्या गावाचे नावही आठवत नव्हते.. काही दिवसांपूर्वी त्याला काही कामासाठी आधार कार्ड हवे होते आणि ख्वाजा साहेब त्याला एका केंद्रावर घेऊन गेले. तेथे रहिवाशांची माहिती समोर आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आणि 10 वर्षांनंतर दिनेश त्याच्या घरी सुरक्षित पोहोचू शकला.