Balasaheb Thorat PC | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवरही अनेक गंभीर आरोप केले होते. त्यावरुन सध्या विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच आज परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यासर्व घडामोडींवर बोलताना राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. एक पत्र अन् लगेच त्या मंत्र्याची चौकशी असं कसं होऊ शकतं?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.





















