एक्स्प्लोर

Eng Vs Pak 1st Test : पाकिस्तानचा संघ बकवास, इंग्लंड 3-0 जिंकणार...; मालिका सुरू होण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉडची भविष्यवाणी, संपूर्ण पाक टीमची लायकी काढली, नको नको ते बोलला

Pakistan vs England 1st Test : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.

Pakistan vs England 1st Test : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्याआधीच इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका वक्तव्यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आलं आहे. ब्रॉडने पाकिस्तानच्या सध्याच्या संघावर जोरदार टीका करताना चक्क या संघाला बकवास म्हटलं आहे. एवढंच नाही तर इंग्लंड पाकिस्तानचा 3-0 असा क्लीन स्वीप करेल, अशी भविष्यवाणीही त्याने केली आहे. 

स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीनंतर समालोचक आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून आपली नवी इनिंग सुरू केली आहे. एका पॉडकास्टमध्ये पाकिस्तान-इंग्लंड कसोटी मालिकेबाबत चर्चा करताना त्याने पाकिस्तानच्या संघाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणालाही त्याने कमकुवत असल्याचं म्हटलं आहे.

‘पाकिस्तानचा संघ बकवास आहे...’ - ब्रॉडचं वादग्रस्त वक्तव्य

पॉडकास्टमध्ये बोलताना ब्रॉडने पाकिस्तानच्या संघाबाबत अत्यंत बोचरी प्रतिक्रिया दिली. त्याच्या मते, पाकिस्तानकडे इंग्लंडला आव्हान देण्याइतकी मजबूत टीम नाही. त्यामुळे इंग्लंड ही मालिका सहजपणे 3-0 ने जिंकेल, असा दावा त्याने केला. ब्रॉड म्हणाला, “त्यांच्याकडे मोहम्मद अब्बास आहेत. ते 36 वर्षांच्या वयात संघात परतले आहेत. पण त्यांचा संघ बकवास आहे. त्यांची टीम चांगली नाही. त्यामुळे इंग्लंड ही मालिका 3-0 ने सहज जिंकेल, असा माझा अंदाज आहे.” ब्रॉडच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, त्याने पाकिस्तानच्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास यांना संघातील सर्वात कमकुवत दुवा ठरवलं आहे.

36 वर्षांच्या अब्बासची दमदार कमबॅक

स्टुअर्ट ब्रॉडने मोहम्मद अब्बास यांच्या वयावर प्रश्न उपस्थित केला असला, तरी मैदानावरील त्यांची कामगिरी मात्र प्रभावी राहिली आहे. 36 वर्षांच्या वयात पाकिस्तानच्या कसोटी संघात पुनरागमन केल्यानंतर अब्बासने शानदार गोलंदाजी केली आहे. पुनरागमनानंतर केवळ तीन सामन्यांमध्ये त्याने तब्बल 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे ब्रॉडने केलेली टीका मैदानावरील अब्बासच्या अलीकडच्या कामगिरीशी विसंगत असल्याचंही पाहायला मिळत आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अब्बास आपल्या गोलंदाजीने या टीकेला उत्तर देतात का, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

इंग्लंडमध्ये पाकिस्तानचा तीन दशकांचा दुष्काळ

पाकिस्तानसाठी इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटचा इतिहास फारसा दिलासादायक नाही. पाकिस्तानने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर अखेरची कसोटी मालिका 1996 मध्ये पराभूत केली होती. त्यानंतर तब्बल तीन दशके उलटली आहेत, मात्र पाकिस्तानला ब्रिटनमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर ब्रॉडचा 3-0 विजयाचा दावा पाकिस्तानसाठी आणखी बोचरा ठरला आहे. दुसरीकडे, इंग्लंडला आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा वर्चस्व कायम ठेवण्याची संधी आहे.

बाबर आझम पहिल्या कसोटीतून बाहेर

पाकिस्तानला मालिकेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. बाबर आझम एका सराव सामन्यादरम्यान उजव्या हाताला दुखापत करून बसला. या दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. काही आठवड्यांपूर्वीच शान मसूदच्या जागी बाबर आझमकडे पुन्हा पाकिस्तानच्या कसोटी संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचं पहिल्या सामन्यातून बाहेर पडणं हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनाला बाबरच्या पुनरागमनाची आशा आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक सरफराज खान यांनी बाबर लॉर्ड्सवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत नक्कीच पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे ही वाचा -

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eng Vs Pak 1st Test : पाकिस्तानचा संघ बकवास, इंग्लंड 3-0 जिंकणार...; मालिका सुरू होण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉडची भविष्यवाणी, संपूर्ण पाक टीमची लायकी काढली, नको नको ते बोलला
पाकिस्तानचा संघ बकवास, इंग्लंड 3-0 जिंकणार...; मालिका सुरू होण्याआधीच स्टुअर्ट ब्रॉडची भविष्यवाणी, संपूर्ण पाक टीमची लायकी काढली, नको नको ते बोलला
Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-5 Live : पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Embed widget