एक्स्प्लोर
Big B Birthday: 'जलसा' बाहेर चाहत्यांचा महासागर, Amitabh Bachchan यांच्या एका झलकसाठी गर्दी
बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मुंबईतील त्यांच्या 'जलसा' (Jalsa) निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या कलाकाराला बघण्यासाठी, त्याची एक झलक कॅमेरामध्ये कैद करुन घेण्यासाठी चाहते अत्यंत आतुर झाले होते. सकाळपासूनच चाहते शुभेच्छा देण्यासाठी जमले होते आणि संध्याकाळी अमिताभ बच्चन यांनी घराबाहेर येऊन या शुभेच्छांचा स्वीकार केला. या खास दिवशी बिग बींनी स्वतःला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. त्यांनी अलिबागमध्ये (Alibag) कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. त्यांनी अलिबागमधील HOABL Phase 2 परिसरात तीन मोठे प्लॉट खरेदी केले असून, त्यांची एकूण किंमत ६.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही खरेदी त्यांच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी ७ ऑक्टोबर रोजी नोंदणीकृत झाली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















