Amit Gorkhe on Deenanath Mangeshakar Hospital | चूक असेल म्हणूनच डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला
Amit Gorkhe on Deenanath Mangeshakar Hospital | चूक असेल म्हणूनच डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला
डिपॉझिट न भरल्यामुळे गरोदर महिलेवर उपचारास नकार देणाऱ्या आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असणाऱ्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबतचा अहवाल समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या अहवालाबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानुसार संबंधित घटनेसाठी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला (Dinatha Mangeshkar hospital) दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालात रुग्णालयाने स्वत:ला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या, असेही म्हटले आहे. यानंतर भाजपचे आमदार अमित गोरखे हे आक्रमक झाले आहेत.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असं डॉ. राधाकिशन पवारांनी आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर डॉक्टर घैसास आणि टीमवर गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी आक्रमक भूमिका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या






















