American Indians on Lok Sabha : काँग्रेसचं कमबॅक, मोदींना सेटबॅक; अमेरिकेतील भारतीयांना काय वाटतं?
मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) 8 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार, अशी एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि यांच्यासह मंत्र्यांचा देखील शपथविधी त्याच दिवशी पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी 8 जूनला यांचा शपथविधी
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 8 जूनला नरेंद्र मोदी यांचा शपथविधी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 7 आणि 8 जूनला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज दिल्लीमध्ये एनडीएची सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली.
मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार
लोकसभा निवडणुकीत एनडीएने (NDA) 292 जागा जिंकून बहुमताचा आकडा ओलांडला आहे, त्यामुळे ते लगेचच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदी 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला. नरेंद्र मोदी सध्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत.