Ajit Pawar Group Meet Sharad Pawar : अजितदादा गटाकडून आशीर्वाद घेत, पक्ष एकसंध राहावा म्हणून विनंती
शरद पवार आणि अजित पवार... गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले काका-पुतणे... आधी अजित पवारांनी बंड केलं, त्यामुळे चर्चेचे केंद्रबिंदू ठरले... आणि काल आणि आज तर महाराष्ट्रभर चर्चेचं वादळ सुरू झालंय. आणि त्याचं कारण म्हणजे, अजित पवारांनी आज सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या पवारांची भेट घेतलीय. काल मंत्र्यांना सोबत घेऊन भेट तर आज आमदारांना घेऊन भेट... कालही आशीर्वाद घेत, पक्ष एकसंध राहावा म्हणून विनंती आणि आजही... खरंतर, कालही आणि आजही शरद पवारांना कसलीही कल्पना न देता, अचानक अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतलीय. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची सुमारे दीड तास चर्चा झाली. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी भेटूनही, भूमिकेत बदल नसल्याचं पवारांनी म्हटलंय. त्यामुळे, अजित पवार यांचे शिष्टाईचे प्रयत्न तूर्तास तरी फसल्याचं बोललं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या























