एक्स्प्लोर
Pawar Land Deal : 'पार्थ पवारांच्या जमीन कागदपत्रांमध्ये गंभीर चुका', सामाजिक कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचा आरोप
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारावर गंभीर आरोप केले आहेत. 'पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराच्या कागदपत्रांमध्ये चूका असल्याचा' आरोप विजय कुंभार यांनी केलाय. या व्यवहाराच्या कागदपत्रांमध्ये पुण्यातील मुंढवा (Mundhwa) भाग मुळशी (Mulshi) तालुक्यात असल्याचा चुकीचा उल्लेख आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर, प्रमिडिया एंटरप्रायझेसचे भागीदार दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्या नावापुढे 'स्त्री' असा उल्लेख असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कुंभार यांनी यासंदर्भात एक 'एक्सपोस्ट' (X Post) करून हे मुद्दे लोकांच्या समोर आणले आहेत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरू शकते.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















