Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 8 ऑक्टोबर 2021 शुक्रवार | ABP Majha
1. आयकर विभागाच्या धाडीतून धक्कादायक माहिती समोर, 1 हजार 50 कोटींचे संशयास्पद व्यवहार, महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, दलालांचा सहभाग
2. अजित पवारांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीयही इन्कम टॅक्सच्या रडारवर, पार्थ पवारांच्या कार्यालयाची 12 तास झाडाझडती, तर तीन बहिणींच्या घरीही छापा
3. आजपासून दसऱ्यापर्यंत दररोज 15 लाख जणांच्या लसीकरणाचं लक्ष्य, आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून मिशन कवच कुंडलची घोषणा, 1 कोटी डोस उपलब्ध
4. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा काल संध्याकाळपासून खंडीत, रत्नागिरीतील परतीच्या पावसाचा तडाखा, वीजपुरवठा सुरळीत करण्याचं महावितरणसमोर आव्हान
5. चिपी विमानतळाचा उद्या लोकार्पण सोहळा, श्रेयवादाच्या लढाईत राणे समर्थकांचे पोस्टरमधून शिवसेनेला चिमटे
6. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनसह 8 जणांना 14 दिवस न्यायालयीन कोठडी, आज जामीन अर्जावर सुनावणी
7. केंद्राच्या मदतीची किती काळ वाट पाहायची? शेतकऱ्यांना मदत देण्यात केंद्राचा सहभाग नसल्याचा खेद, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
8. गावातील सरपंचानं पैशाचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी केली वाघाच्या बछड्याची शिकार, नागपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
9. महागाईचा 'भडका'; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाकल्या, पेट्रोल 30 पैशांनी, तर डिझेल 35 पैशांनी महागलं
10. केकेआरच्या विजयामुळे मुंबईची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा धूसर, आज मुंबई-हैदराबादेत सामना