ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 17 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 17 April 2025
नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडून कारवाईला स्थगिती, याचिकेवर उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का घेतली नाही, अशी विचारणा, हायकोर्टाकडे मागवला खुलासा
जिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार, नाशकातल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल, फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमा
मी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ए मोदी अभियान, ठाकरेंची टीका, तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
नाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन, अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा, आमदार रोहित पवारांच्या नावे अजितदादांच्या स्वागताचे बॅनर.
हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का?, वक्फ कायद्याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल...विधेयकाला स्थगिती द्यायला तूर्तास नकार... आज पुन्हा सुनावणी..























