ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 11 Aug 2024 : ABP Majha Marathi News
ABP Majha Headlines : सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स : 11 Aug 2024 : ABP Majha Marathi News
ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसे कार्यकर्त्यांचा तुफान राडा, ठाकरेंच्या वाहनावर शेण, नारळ, बांगड्या फेकल्या.
अॅक्शनला रिअॅक्शन असते .... ठाण्यात मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी गोंधळ घालणाऱ्या मनसेच्या महिला कार्यकर्तांना पोलिसांकडून जामिन मंजूर. जामिन मिळताच महिला आंदोलकांनी केला राज ठाकरेंना व्हिडीओ कॉल.
हे नाग नव्हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ, ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता घणाघात.
मंत्रालय मुंबईला हवं की अहमदाबादला? उद्धव ठाकरेंचा टोला, विधानसभेत मशालीची धग दाखवून देणार, ठाकरेंचा इशारा.
ज्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणला तोच आमचा फेस, खासदार संजय राऊतांचा घणाघात...
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज कागलमध्ये मेळावा, मेळाव्यातून कोल्हापुरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार.