ABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024
मुंबईत अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा, ५०-६० किमी प्रति तास वेगानं वारे वाहण्याचा अंदाज
((मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा))
मुंबईत काल २६७ ते ३०० मिमी पाऊस, पूरस्थिती हटवण्यासाठी पालिकेचे ४४१ पंप तैनात, तर तिन्ही रेल्वेमार्ग सुरू झालेत, आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची माहिती.
हार्बर मार्गावरची रेल्वेवाहतूक हळूहळू पूर्वपदावर,सकाळपासून दोन वाजेपर्यंत हार्बरवरच्या लोकलला लागला होता ब्रेक, सेंट्रल रेल्वेवरची अप मार्गावरची जलद वाहतूक मात्र अजूनही ठप्प..
पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात ७ ते ८ टक्क्यांनी वाढ... मुंबईतील ७ धऱणांमध्ये १८.७४ % पाणीसाठा...तर विहार तलाव ओव्हरफ्लो
किल्ले रायगड ३१ जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद,
काल ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं प्रशासनाकडून खबरदारीचं पाऊल
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी २०५ मिमीहून अधिक पावसाचा अंदाज
((रत्नागिरी, सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट))
तापी नदीवरच्या हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली, ४१ पैकी १० दरवाजे उघडले, 19 हजार 105 क्यूसेक वेगानं होतोय पाण्याचा विसर्ग
अकोल्यात मुसळधार पाऊस... अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्यानं बळीराजा चिंतेत... तर बुलढाण्यातल्या गारडगावाला पुराचा वेढा..
मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह अजूनही फरार, पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी
((आरोपी मिहीर शाहासाठी लुकआऊट नोटीस))
पुण्यात काल एकाच रात्री हिट अँड रनच्या दोन घटना, दोन्ही घटनांमध्ये एकेक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यु, एक कॉन्स्टेबल जखमी, दोन्ही वाहनचालक फरार
लंडनमधली वाघनखं शिवरायांची नाहीतच, इंद्रजित सावंतांना लंडनच्या म्युझियमचं पत्र, सावंत म्हणतात वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत, सचिन अहिर म्हणतात सरकारनं संभ्रम दूर करावा...
काश्मीरच्या कुलगाममध्ये राहत्या घरी सापडलं मोठं बंकर, दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर घराची झडती घेतल्यावर बंकर आढळलं
((लाकडी कपाटामागे मोठं बंकर!))
राहुल द्रविडला भारत सरकारनं भारतरत्न द्यायला हवं, माजी कर्णधार सुनील गावसकर यांची मागणी
((राहुल द्रविड यांना भारतरत्न द्या-गावस्कर))
माउली महाराजांच्या पालखीचं पाहिलं उभं रिंगण