ABP Majha Headlines : 7 AM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह.. राज्यभरात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी, मंदिर आकर्षक रोषणाईने सजली
घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीच्या मोहिमेला सुरुवात, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
महाविकास आघाडीतला मुंबईतील ३६ जागांपैकी २३ जागांचा तिढा सुटला.. ठाकरे १२, काँग्रेस ८ आणि राष्ट्रवादी, समाजवादी प्रत्येकी एक जागा लढणार..
राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट, आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित
खासगी मेडिकल कॉलेजांकडून दुसऱ्या फेरीतील प्रवेश स्थगित, शुल्क परतावा थकबाकी मिळवण्यासाठी संस्थांचा पवित्रा
कुडाळमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता.. वर्षावर नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक... उदय सामंतांनीही निलेश राणेंसोबत उभं राहणार असल्याचं केलं स्पष्ट...
मराठा आंदोलक मनोज जरांगेंना आज मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज, सुट्टी होताच उद्या जरागेंच्या विविध जिल्ह्यातील समर्थकांसोबत बैठका