ABP Majha Headlines : 3 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश आंबेडकर यांचा राऊतांवर गंभीर आरोप, अकोल्यात विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट, आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट
आज सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषद, शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता, नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार का याकडे लक्ष
शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचं उघड बंड, लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे संभ्रम
ठाणे लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी देवेंद्र फडणवीस कमालीचे आग्रही, मात्र बालेकिल्ला असल्यानं ठाण्याची जागा आम्हालाच मिळावी, एकनाथ शिंदेंची भूमिका
विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जात असल्यानं शिवसेनेत अंतर्गत नाराजी, निगेटिव्ह सर्वेचं कारण देत खच्चीकरण, नेत्यांमध्ये संतापाची भावना
बारामतीमधून निवडणूक लढवण्याबाबत विजय शिवतारे उद्या भूमिका जाहीर करणार, काल रात्री घेतली शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची भेट