ABP Majha Headlines : 6:30 AM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कोलकात्यानं हैदराबादचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून तिसऱ्यांदा जिंकली आयपीएल, कोलकाता १० वर्षांनी तिसऱ्यांदा चॅम्पियन.
कोलकात्याच्या यशात कर्णधार श्रेयस अय्यरसह चार मुंबईकरांचा मोलाचा वाटा, वेंकटेश अय्यरची नाबाद ५२ धावांची, रहमानउल्लाह गुरबाजची ३९ धावांची खेळी, तर आंद्रे रसेलनं १९ धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
आज दहावीचा निकाल जाहीर होणार, दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार.
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'रेमल' चक्रीवादळ धडकलं, बंगालच्या उपसागारात तयार झालेल्या रेमल महाचक्रीवादळाचा वेग १३० किमीपेक्षा पुढे, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळून वादळ आज बांगलादेशकडे जाणार.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘रेमाल’ बाबत भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी, पश्चिम बंगालसह ओडीशामध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात.
रेमल वादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिसात रेड अलर्ट, आजूबाजूच्या दहा राज्यांना पावसाचा इशारा, एअरपोर्टही बंद.