ABP Majha Headlines : 8 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी दिर्घ आजारानं त्याचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जातेय. औद्योगिक क्षेत्रात मोठं योगदान देणारं, देसशेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपल्याच्या भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत.
द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रमी, नफा-तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख होती. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाली आहे. कर्मचाऱ्यांचं अधिकाधिक कल्याण कसं करता येईल यासाठी रतन टाटा नेहमीच प्रयत्नशील असायचे. व्यावसाय करताना समाजाचा विसर पडता कामा नये, असं ते नेहमी सांगायचे. रतन टाटा यांच्या काही आठवणी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी सांगितल्या.
आदर्श, शालीन उद्योगपती हरपला. समाज्याच्या गरजा लक्षात घेत टाटा समुहाचा विस्तार केला. रतन टाटा यांच्या काळापासून टाटा हा ब्रँड उदयास आला, असं गिरीश कुबेर म्हणाले. तसेच 26/11 हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक फेरीवाल्यांना महागड्या रुग्णालयांमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केले. यामध्ये ताज हॉटेलबाहेर चणे-फुटाणे विकणाऱ्यांचा देखील समावेश होता. रतन टाटा यांच्या आदेशानंतर टाटा समुहाने दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या फेरीवाल्यांना शोधून शोधून त्यांच्या घरी जाऊन मदत केली, अशी एक आठवण गिरीश कुबेर यांनी सांगितली.