ABP Majha Headlines : 10 AM : 10 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ तास मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला इशारा
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस... हवामान विभागाचा अंदाज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस... मालेगाव, नांदगाव, चांदवडमध्ये तुफान पाऊस... नद्या प्रवाही... बळीराजा सुखावला, लवकरच पेरण्या सुरू
पुणे शहरासह जिल्ह्यात ३४ वर्षांनी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद, मागील ९ दिवसांत २०९ मिमी पावसाची नोंद
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार
नरेंद्र मोदींचा ७२ मंत्र्यांसह शपथविधी, आता खातेवाटपाची उत्सुकता, अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता...
एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, चिराग पासवान यांनी चारच जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं, शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रिपद
((शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली?))
मानसन्मान संख्याबळावर मिळतो, अजित पवारांना विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचा टोला, महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार माघारी परततील, वडेट्टीवारांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन, पक्षफुटीनंतर दोन्ही गट आज वर्धापन दिन साजरा करणार, राज्यभरात कार्यक्रमांचं आयोजन.
निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडल्याचा वाद सुप्रीम कोर्टात, शेअर मार्केट का कोसळलं याची कारणं जाहीर करण्याचे आदेश सेबी आणि केंद्राला द्या, याचिकाकर्त्यांची मागणी
म्हाडाच्या लॉटरीला आता विधानपरिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा ब्रेक, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर निघणार लॉटरी
पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, रामटेकडी परिसरात दहा ते बारा गाड्यांचं नुकसान, सात ते आठ मुलांच्या टोळक्याकडून दहशत
मरीन ड्राईव्ह ते वरळी अंतर फक्त ९ मिनिटांत पार होणार... कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सेवेत, आज मुख्यमंत्री करणार पाहणी
मरीन ड्राईव्ह ते वरळी अंतर फक्त ९ मिनिटांत पार होणार... कोस्टल रोडचा दुसरा बोगदा उद्यापासून सेवेत, आज मुख्यमंत्री करणार पाहणी‘नीट-यूजी’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी, परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप
जम्मू काश्मीरच्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, १० जणांचा मृत्यू, परिसरात सर्च ऑपरेशन सुरू, २ दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, सहा धावांनी भारताची पाकिस्तानवर मात, लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचं आव्हान संकटात.





















