9 second News : नऊ सेकंदात बातमी सुपरफास्ट : 31 July 2024 : ABPMAJHA
उद्यापासून रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, कोकण, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता , पालघर आणि ठाणे जिल्ह्याला शनिवारी ऑरेंज अलर्ट.
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले, राधानगरीतून 11,500 क्यूसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरु.
मुंबईत मागील दोन महिन्यात ८६ टक्के पाऊस, गुरुवारीही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा जमा झाल्यानं मुंबईकरांना दिलासा.
पुण्याच्या खडकवासला धरण परिसरात संततधार पाऊस सुरु असल्यानं धरणातून विसर्ग वाढणार, खडकवासलातून ११ हजार ४०७ क्युसेकने विसर्ग होणार, त्यामुळं पुणेकरांना सतर्कतेचा इशारा .
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणी साठ्यात वाढ.. पानशेत धरण फुल्ल, तर वरसगाव आणि टेमघर ही दोन धरणं भरण्याच्या मार्गावर
साताऱ्यातील कोयना, महाबळेश्वर धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, कोयना धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा, कोयना धरणातून 40 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.
भंडाऱ्यामध्ये अतिवृष्टी, खुर्सीपार जलाशयाचा कॅनल फुटल्यामुळे हजारो हेक्टर भात पिकाची शेती पाण्याखाली, याप्रकरणी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी.
मनमाड, मालेगाव चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील मका, टोमॅटो पीक हे लष्करी अळी आणि करपा रोगाच्या विळख्यात. महागड्या औषधाची फवारणी करूनही काहीही उपयोग नाही. शेतकरी हवालदिल.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात पसरली दाट धुक्यांची चादर, या घाटाची ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली दृश्य.