आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चकाचक रस्ते मिळणार? 2200 कोटींचा खर्च?
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रस्त्यांसाठी तब्बल 2200 कोटी खर्च करण्यात येणार आहे. रस्त्याच्या डागडुजी आणि खड्डेविरहित रस्त्यांसाठी पालिकेने निविदा जाहीर केल्यात. या कामांमध्ये नागरी क्षेत्रातील रस्त्यांसाठी 700 कोटी तर म्हाडाच्या लेआऊट रस्त्यांकरता 300 कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच पालिकेनं बाराशे कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. मात्र, कंत्राटदारानं 30 टक्के कमी रकमेनं निविदा भरल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या बाराशे कोटींच्या फेरनिविदा काढून वाढीव हजार कोटींच्या नव्या कामांच्या निविदाही काढण्यात आल्यात. मात्र कोट्यवधी खर्च केल्यानंतरही मुंबईकरांना चकाचक रस्ते मिळणार का? खड्डेमुक्त रस्त्यावरुन मुंबईकरांचा प्रवास होणार का? असे सवाल उपस्थित होतोय.























