Nalasopara Lockdown | नालासोपारा शहरातील पाच प्रभागात लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद
वसई विरार क्षेञात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावर पाहता, आता प्रशासनाने ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या वाढत आहे तेथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. नालासोपारा शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेच्या पाच प्रभागात आज पासून पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर, अल्कापुरी रोड तसेच नालासोपारा पश्चिमेकडील निलेगाव, सोपारागाव, समेळपाडा या ठिकाणी आजपासून लॉकडाऊन लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं तसंच इतर आस्थापनं बंद असणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. आजच्या घडीला वसई विरार क्षेत्रात कोरोनाने 7,600 चा आकडा पार केला आहे. अल्कापुरीतून आमचे प्रतिनीधी प्रभाकर कुडाळकर यांनी लॉकडाऊनचा आढावा घेतलाय.






















