Kolhapur Swapnil Kusale Rally : कोल्हापूर पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाच्या कॅमेरामनला धक्काबुक्की
कोल्हापूर : आतापर्यंत कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या पोलिस दलावर आता डाग लागला आहे. ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेच्या स्वागतयात्रेत कोल्हापूर पोलिसांची मुजोरी दिसून आली. एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. त्याचवेळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनीही अरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या या कृत्याचा कोल्हापूर प्रेसकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.
ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट स्वप्निल कुसाळे याच्या स्वागतासाठी कोल्हापुरात स्वागत रॅली आयोजित करण्यात आली होती. या स्वागत रॅलीमधे एबीपी माझाच्या कॅमेरामनला पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्याचवेळी जिल्हा पोलिस प्रमुखांनी एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना अरेरावी करत धक्काबुक्की केली.