Kolhapur Car Robbery : मित्राच्या कारच्या बदलायचा होता पार्ट, पठ्ठ्यानं अख्की कारचं चोरली
मित्राच्या गाडीला पार्ट बसवण्यासाठी चक्क गाडी चोरल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडलीय. त्याचं झालं असं की, नामदेव महाडिक यांच्या मित्राच्या गाडीचा एक पार्ट खराब झाला होता. तो कुठेही मिळत नव्हता. त्यात भरीत भर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात टाटा सियारा या केवळ तीनच गाड्या आहेत. त्यामुळे यापैकीच एका गाडीचा पार्ट नामदेव याने मित्राच्या गाडीसाठी वापरण्याचं ठरवलं. याकरता त्याने बरेच दिवस रस्त्याच्या कडेला असलेल्या कदमवाडीतील एक गाडी चक्क क्रेन लावून चोरली. ही गाडी राजेशकुमार पाटील यांच्या मालकीची असल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्हीत समोर आल्यावर केवळ मित्राच्या मदतीसाठी गाडी चोरल्याची कबुली नामदेवने दिलीय. या अजब चोरीची जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगलीय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
