Jharkhand Petrol :झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25रूपयांनी कमी करण्याचा निर्णय,नागरिकांना दिलासा
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर पेट्रोलचे दर तब्बल 25 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झारखंडच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 26 जानेवारीपासून याची अंमलबजावणी करण्यात येण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सामन्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. केंद्राच्या निर्णानंतर अनेक राज्यांनी व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भाजपशासित राज्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. याशिवाय पंजाब, राज्यस्थान आणि छत्तीसगढ या भाजपचं सरकार नसलेल्या राज्यांनीही व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र सरकारने अद्याप पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतलेला नाही.






















