Jalna Lathicharge : जालना लाठीचार्जप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती
Jalna Lathicharge : जालना लाठीचार्जप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती
Jalna Protest : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. तर या सर्व घटनेला सरकार जबाबदार असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. हे गृहविभागाचे अपयश असून, फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे.























