एक्स्प्लोर
Sharad Koli Notice : आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शरद कोळी यांना नोटीस, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात धरणगाव येथील सभेत युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा उद्धव ठाकरे सेनेचे नेते शरद कोळी यांनी आक्षेपार्य वक्तव्य केले होते. यावरून गुजर समाजाने तसेच शिंदे गट सेनेतर्फे शरद कोळी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. निवेदनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून शरद कोळी यांना जळगाव जिल्ह्यातील सभांना भाषण करण्यास बंदी घालण्यात येवून गुन्हा दखल करण्यात आला आहे .दरम्यान पोलीस याबाबतची नोटीस देण्यासाठी शरद कोळी राहत असलेल्या हॉटेलवर गेले पोलीस गेले असता, या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विरोध केल्याने मोठा गोंधळ उडाला.
आणखी पाहा


















