Jalgaon : Gulabrao Patil यांचे कार्यकर्ते आक्रमक, गुलाबरावांचे मुखवटे घालून सभास्थळाकडे रवाना
उद्धव ठाकरेंची जळगावमधील पाचोरा येथे थोड्याच वेळात सभा होणारे... यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीतील खेड आणि नाशिकमधील मालेगावमध्ये सभा घेतली होती... तिसरी सभा पाचोऱ्यात सभा होतेय... या सभेची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.. या सभेपूर्वी राजकारण तापलं असून संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्याच चांगलेच शब्दबाण चालले होते.. शिंदेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभे साठी रवाना होत होते मात्र... सभेच्या ठिकाणी पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना अडवलं. दरम्यान, जाहीर सभेपूर्वी त्यांनी आर. ओ. पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं...


















