Jalgaon Banana : अज्ञातांनी केळीची 7 हजार झाडं कापून फेकली; राजेंद्र चौधरी यांच 25 लाखाचं नुकसान
एकीकडे अवकाळीचं संकट असताना तिकडचे जळगावात ऐन काढणीला आलेली केळीची सात हजार झाडं कापून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यावल भागातील अट्रावल गावात काही विघ्नसंतोषी लोकांनी हे कृत्य केलंय. यामुळे राजेंद्र चौधरी या शेतकऱ्याचं तब्बल २५ लाख रुपयांचं नुकसान झालंय. गेल्या काही महिन्यांमध्ये रावेर-यावल पट्ट्यात केळीच्या बागा कापून फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यात रावेर यावल भागात शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा विघ्न संतोषी लोकांच्या कडून कापून फेकल्या जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये संतापाची लाट आहे. अशाच एका घटनेत यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकरी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या शेतात असलेल्या केळीच्या सात हजार झाडांची विघ्न संतोशिनी कापणी करून त्याची नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे गेल्या वर्षभर पासून मोठ्या प्रमाणत खर्च लाऊन तयार केलेला हा केळीचा मला कापून फेकल्याने राजेंद्र चौधरी यांचे जवळपास पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एन काढणीच्या तोंडावर त्यांची केळीबाग कापून फेकल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये मोठा रोष असल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे