IPS Vinay Tiwari | सुशांतसिंह प्रकरणी तपासासाठी आलेले IPS विनय तिवारी अखेर क्वॉरंटाईनमधून मुक्त
मागील जवळपास सात दिवसांपासून मुंबईत क्वॉरंटाईन करण्यात आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तसेच मुंबईत या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना लीड करण्यासाठी मुंबईत आले होते. ज्या दिवशी विनय तिवारी मुंबईत आले त्याच दिवशी मुंबई महानगर पालिकेने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर त्यांना क्वॉरंटाईन केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं होतं. विनय तिवारी यांचं मुंबईतील क्वॉरंटाईन संपवण्यासाठी गुरुवारी याचिका देखील दाखल करण्यात आली होती. अखेर आज सकाळी त्यांचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपवण्यात आला आणि संध्याकाळी पाचच्या फ्लाईटने ते बिहारच्या दिशेने रवाना झाले.






















