NEW Education Policy 2020 | पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण गरजेचंच : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. परंतु आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार आहे. मोदी सरकारने बुधवारी (29 जुलै) नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. परंतु, हे नवं शैक्षणिक वर्ष कधीपासून लागू होणार आहे? तसेच यासंदर्भातील इतर अनेक प्रश्नांची उत्तरं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत बातचित केली.
नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, 'आपल्या देशात तीस कोटी विद्यार्थी आहेत. त्यांच्या जीवनावर अमूलाग्र परिणाम करणारं हे धोरण आहे. सर्वच मुलांना लोअर केजी सिनियर केजी सर्वच विद्यार्थ्यांना मिळत नव्हतं. पण आता नव्या धोरणामुळे सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच यासाठी अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यादेखील शिक्षण प्रक्रियेचा भाग होणार आहेत. त्यामुळे हा नव्या शैक्षणिक धोरणात्मक प्रक्रियेचा सर्वात पहिला बदल आहे.'