GN Saibaba vs SC : जी. एन. साईबाबा यांच्या सुटकेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, काय आहे प्रकरण?
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून जी. एन. साईबाबा यांची सुटका करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला, सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा यांना निर्दोष ठरवलं होतं. त्याला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. प्राध्यापक साईबाबांना नजरकैदेत ठेवण्याची त्यांची मागणीही सुप्रीम कोर्टाने फेटाळली. यूएपीएअंतर्गत तुरुंगवासच झाला पाहिजे हा नियम असल्याचं सांगत कोर्टाने साईबाबांच्या वकिलांची मागणी फेटाळली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कथित माओवादी संबंध प्रकरणात जीएन साईबाबा आणि इतरांची निर्दोष मुक्तता केली होती आणि त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते.





















