Special Report : पंतप्रधान नरेंद्र मोदी- शरद पवार यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली. पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली. या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सहकार आणि बँकिंग यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी ही भेट घेण्यासंदर्भात आधीच माहिती दिली होती. गुरुवारी मुंबईमध्ये शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेणार असल्याबाबत पूर्वकल्पना दिली होती.





















