केंद्र सरकारच्या पशुखाद्य खरेदीमुळे Soybean चा दर घसरणार? शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता
केंद्र सरकारनं १२ लाख टन डीओसी म्हणजेच पशूखाद्य आयात करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण सोयाबीनला कधी नव्हे तो दहा हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांत सोयाबीनचा पेराही वाढलाय. अशावेळी केंद्र सरकारनं जनुकीय बदल केलेल्या सोयाबीन डीओसी म्हणजेच पशुखाद्याच्या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. २५ दिवसांपूर्वी सोयाबीनचा दर १० हजार रुपये क्विंटल इतका वाढला होता. त्यानंतर त्यात दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे आता ८ हजारावर असलेला सोयाबीनचा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.























