एक्स्प्लोर
JEE, NEET 2020 | जेईई, नीट परीक्षा ठरल्याप्रमाणे सप्टेंबरमध्येच होणार, रमेश पोखरियाल यांचे स्पष्ट संकेत
कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशात जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षा घेण्यावरून दोन मतं दिसत आहे. अनेक राज्यांनी नीट आणि जेईईची परीक्षा पुढे ढकण्याची मागणी केली आहे. तर केंद्र सरकार परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर ठाम आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबातत बोलताना म्हटलं की, एनटीएच्या (NTA) संचालकांनी सांगितल्याप्रमाणे जेईईच्या 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी साडेसात विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलं आहे. तर नीटच्या 15.97 लाख विद्यार्थ्यांपैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड गेल्या 24 तासात डाऊनलोड केलं आहे
आणखी पाहा























