Ayodhya Ram Navami : अयोध्येत श्री प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची पहिली रामनवमी
आज चैत्र शुक्ल नवमी... अर्थात रामनवमी... ज्या रामाने अखंड जगाला मानवता, संयम, विनम्रता, मर्यादा, न्याय आणि शौर्याची शिकवण दिली त्या, प्रभू रामाचा जन्म झाला आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने पुण्य पावन झाला... हीच रामनवमी देशभरासह जगभरात मोठ्या भक्तिभावाने साजरी होतेय... पुण्यभूमी अयोध्येत तर रामनामाचा अवघा जयघोष होतोय... तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू राम अयोध्येच्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले, त्या सुवर्ण क्षणाला दोन महिने पूर्ण झालेत... आणि त्यानंतरची ही पहिलीच रामनवमी... म्हणूच, अयोध्येत भक्तांची अवघी मांदियळी अवतरलीय... आणि एकाच मंत्राच्या उच्चाराने अवघा भवताल भारून गेलाय... आणि तो म्हणजे जय श्रीराम... जय श्रीराम






















