Pranab Mukherjee Book : प्रणव मुखर्जींच्या डायरीमधील राहिल गांधींचा तो किस्सा काय? ABP MAJHA
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांचं नवं पुस्तक लवकरच प्रकाशित होतंय. त्यात त्यांनी प्रणवदांचं राहुल गांधींबद्दल काय मत होतं, त्याबद्दल सविस्तार लिहिलं आहे. शर्मिष्ठा यांनी अनेक किस्से या पुस्तकात लिहिले आहेत. एकदा प्रणवदांनी राहुल गांधींना भेटण्याची वेळ संध्याकाळची दिली होती. पण राहुल यांच्या कार्यालयानं गडबड केली, आणि राहुल सकाळीच प्रणवदांच्या घरी प्रकटले. ज्यांना सकाळ-संध्याकाळमधला फरक कळत नाही, ते देश काय चालवणार, अशी प्रतिक्रिया तेव्हा प्रणवदांनी खासगीत दिली होती. तसंच, काँग्रेसच्या १३०व्या स्थापना दिनाला देखील राहुल अनुपस्थित होते. त्याबद्दलही प्रणवदांनी आपल्या डायरीत बरंच काही लिहून ठेवलं आहे.






















