Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींच्या मेव्हण्याचा अपघाती मृत्यू
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींच्या मेव्हण्याचा अपघाती मृत्यू सुप्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या मेव्हण्याचा कार अपघातात मृत्यू झाला, तर बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. झारखंडमधील धनबाद शहरात त्यांच्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. कार वेगात असल्यानं दुभाजकावर धडकल्याची माहिती मिळतेय. त्रिपाठी यांची बहीण आणि मेव्हणा गोपालगंजहून कोलकात्याला जात असताना हा अपघात घडला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्रिपाठी यांचे मेव्हणे मुन्ना तिवारी यांचा मृत्यू झाला, तर बहीण सरिता तिवारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंकज त्रिपाठी तातडीनं धनबादकडे रवाना झाल्याचं कळतंय.























