PM Narendra Modi RBI:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते RBIच्या योजनांचा शुभारंभ, काय आहेत या योजना ?
Customer Centric initiatives of the RBI: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) दोन नव्या योजनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज, शुक्रवारी शुभारंभ झालाय. सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून या योजनेचा पंतप्रधान मोदी यांनी शुभारंभ केला. आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना आणि रिझर्व बँक- एकात्मिक लोकपाल योजना या दोन योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झालाय. केंद्रीय अर्थ मंत्री आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केलं. यावेळी ते म्हणाले की, ‘आज ज्या दोन योजनेचा शुभारंभ केला, त्यामुळे देशातील गुंतवणूक वाढणार आहे. तसेच या योजनांमुळे गुंतवणूकधारकांसाठी कॅपिटल मार्केटपर्यंत पोहचणं अधिक सुरक्षित आणि सोपं होणार आहे.’