एक्स्प्लोर

Ramesh Jarkiholi | बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

बेळगाव : महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोडला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला असताना दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्याचा एका तरुणीसोबत लगट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे.

बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने जवळीक साधून युवतीवर अत्याचार केल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीच्या आमिषाने युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे.

दिनेश कलहळ्ळी यांनी आज शहराचे पोलीस आयुक्त कमल पंत यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीत दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं आहे की, "रमेश जारकीहोळी यांनी केपीटीसीएलमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वारंवार 25 वर्षीय तरुणीचं लैंगिक शोषण केलं."

परंतु नंतर तिला नोकरी देण्यास नकार दिल्याचं समजल्यानंतर तरुणीने त्या दोघांमधील वैयक्तिक क्षण रेकॉर्ड केले. ही बाब समजल्याच रमेश जारकीहोळी यांनी तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली, असंही दिनेश कलहळ्ळी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आज व्हायरल झालेला व्हिडीओ महिनाभरापूर्वीचा असल्याचं कळतं. हा प्रकार बंगळुरुच्या कबॉन पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेलमध्ये घडला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी कलहळ्ळी यांना कबॉन पार्क पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितलं.

तरुणीच्या कुटुंबीयांनी दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे गाऱ्हाणं मांडल्यानंतर ते पोलिसांत पोहोचले. यावेळी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

हे संवेदनशील प्रकरण असल्याने गुन्हा दाखल करण्यापूर्वी आम्ही अंतर्गत चौकशी करु, असं उत्तर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान रमेश जारकीहोळी हे कर्नाटकातील मोठे राजकीय प्रस्थ आहे. पूर्वी काँग्रेसचे नेते असलेल्या जरकीहोळी यांचा कर्नाटकात भाजपची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा आहे. काँग्रेसमधून बंडखोरी करत त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. परंतु आता जारकीहोळी यांच्या सीडीमुळे कर्नाटकातील विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

भारत व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 June 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! विठुरायाच्या कृपेने कठीण काळ संपणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य..
आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! विठुरायाच्या कृपेने कठीण काळ संपणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य..
Shivsena : शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार नेमका कोण? 
शिंदेंना पाठिंबा देणारे ठाकरेंचे पाच खासदार फायनल, उशीरा दिल्लीत पोहोचणारा सहावा खासदार नेमका कोण? 
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अॅडव्हान्स, संजय राऊतांच्या पोस्टमुळं ऑपरेशन टायगरला पुष्टी?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलांचा वेग कायम , राज्यातील 12 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget